lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Wednesday, August 15, 2012

लाड समाजाचा समावेश एनटी किंवा एसबीसीमध्ये करावा,

एनटी किंवा एसबीसीत समावेश करा
ओबीसी प्रवर्गातील अत्यल्पसंख्याक असलेला लाड समाज आज महाराष्ट्रात नाशिक,अहमदनगर, शेवगाव, चांदगाव, हदगाव, पाटेगाव, पैठण, पिराची पिंपळवाडी, कातपूर, जायकवाडी, नवगाव, राक्षसभुवन, सराटी, आंतरवाली, आडगाव, अंबड, जालना, औरंगाबाद, मानवत, परभणी, पुणे, कात्रज, चाकण, मुंबई, सोलापूर, सातारा आदी ठिकाणी लाड समाजाचे वास्तव्य आढळून येते. ओबीसींच्या सवलती प्राप्त होत नाहीत यासाठी लाड समाजाचा समावेश एनटी किंवा एसबीसीमध्ये करावा, असा आग्रह या समाजाचे लक्ष्मीकांत म्हस्के व विलास फुटाणे यांनी धरला आहे. लाड समाज हा नेमका कोणता असा प्रश्न अन्य समाजातून विचारण्यात येतो. या समाजाचा नेमका व्यवसाय काय, त्यांची लोकसंख्या आणि वस्ती कोठपर्यंत, त्यांची सामाजिक परिस्थिती, त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक चालीरीती काय असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. ओबीसी प्रवर्गात मोडणारा लाड समाज हा अत्यल्पसंख्याक समाज आहे. लाड समाजाबद्दल अनेक दंतकथाही पसरलेल्या आहेत. सध्या तरी या समाजाची अस्तित्वासाठीच लढाई सुरूआहे, असे म्हटल्यास वावगे ठरूनये.
चक्रधर स्वामी हे सामवेदी लाड
भडोच (गुजरात) मधून हा समाज महाराष्ट्रात आला. अन्य काही आख्यायिका आहेत; पण हा पुरावा ग्राह्य धरला तर चक्रधर स्वामी हे खुद्द सामवेदी लाड शाखेचे होते. ते भडोचहून रामयात्रेचे निमित्त करून महाराष्ट्रात आले होते. लीलाचरित्र आणि महानुभाव साहित्यामध्ये हा उल्लेख आढळून येतो. तसेच डॉ. वि.भि. कोलते संपादित आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित शासकीय प्रतींमध्ये पूर्वार्धामधील ३२ क्रमांकाची लीला, उत्तरार्धामध्ये १५0, ५११ या लीलांमध्ये लाड शाखेचा उल्लेख आलेला आहे. अकराव्या शतकात लाड समाज इकडे वावरत होता. त्याला सामाजिक प्रतिष्ठा होती. हळूहळू या समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परिस्थिती घसरत गेली. लोकसंख्या मोठी नसल्यामुळे या समाजाची व्होट बँक निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता.
तुटपुंजी राजकीय वाटचाल
पैठणचे बाळासाहेब घुले व पाथर्डीचे विठ्ठलराव रोडी तसेच आंतरवाली, पाटेगाव, नवगाव, हातगाव व कातपूर अशा गावांमध्ये सहकारी सोसायट्यांमधील चेअरमनपद आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापर्यंत या समाजाच्या काही मंडळींची वाटचाल हीच काय ती तुटपुंजी वाटचाल! शेवगावचे बापू शेळके पाटील, नवगावचे आसाराम लाड, हातगावचे लष्करे पाटील, पिंपळवाडीचे ठोंबरे पाटील, कातपूरचे बापूराव रोडी, कोल्हेरचे राम जावळे पाटील, नागोबाच्या वाडीचे शेळके यांच्यासह काही बोटांवर मोजण्याइतक्याच गावांच्या पाटीलकी लाड समाजाकडे आहे. तसेच पाटेगावच्या रावस कंपनीकडे कुलकर्णीकी होती. लाड समाजात शिक्षणाचे प्रमाण तसे फारसे नाही. जे आहे, त्यामध्येही मुलांपेक्षा मुलींची संख्या बरी आहे. आदित्य गौरव पुरस्काराच्या माध्यमातून प्रसिद्ध कवी व वातट्रिकाकार विलास फुटाणे यांनी लाड समाजातील मुला- मुलींना प्रेरणा देण्याचे काम हाती घेतले आहे. अंजली अनिल ठोंबरे आणि नेहा शेळके या गुणवंत मुलींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
पोटजाती अनेक; पण
वैष्णव लाड, महाजन लाड, पांचाळ लाड, कारंजे लाड अशा शाखा, उपशाखा लाड समाजात आहेत. तसेच लाड सोनार, लाड सावजी, लाड वाणी, तारकेसी लाड, लाड सुतार, लाड जैन, लाड परदेशी, लाड लोहार आणि लाड ब्राह्मण अशाही पोटजाती आहेत. आता या पोटजाती विसरून एकत्रित येण्याची गरज आहे व रोटी- बेटी व्यवहार वाढविण्याची आवश्यकता आहे. लाड हा ग्रिक शब्द आहे. समुद्राच्या पाण्याच्या लाटांवरून लाड हा शब्द रूढ झाला.
पैठणीला जर काम करण्यास ज्या सोन्याच्या बारीक तारा काढण्याचे काम हा समाज करीत होता व त्यावरच या समाजाचा उदरनिर्वाह चालत होता. कालांतराने स्पर्धेच्या युगात या व्यवसायात लाड समाज टिकू शकला नाही.
पुरेशी जागृती नसल्यामुळे हा समाज नीटपणाने संघटितही नाही. लाड समाज विकास मंडळ ही संस्था औरंगाबादला काही काळ चालली आणि नंतर बंद पडली. लक्ष्मीकांत म्हस्के हा लाड समाजाचा कार्यकर्ता समाज संघटनेसाठी धडपडत असतो. महाराष्ट्र राज्य ओबीसी जनजागरण व संघर्ष समितीतही म्हस्के सक्रिय आहेत. https://www.facebook.com/AkhilaBharatiyaLadaParisada