lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Saturday, October 6, 2012

महाराष्ट्रातील लाड समाजाच्या व्यथा व कथा

महाराष्ट्रातील लाड समाजाच्या व्यथा व कथा
लाड समाज हा नेमका कोणता असा प्रश्न अन्य समाजातून विचारण्यात येतो या समाजांचा व्यवसाय काय त्याची लोक संख्या  आणी वस्ती कुठपर्यंत त्याची समाजीक परिस्थिती त्यांचा धार्मिक संस्कृती चाली रिती काय असे  अनेक प्रश्न उपस्थित होतात. ओ.बी.सी. प्रवर्गातील मोडणारा लाड समाज हा अत्यल्प संख्याकं समाज आहे. लाड समाजाबद्दल अनेक  लाड समाजाबद्दल अनेक दंतकथाही पसरलेल्या आहेत. सध्या तरी या समाजाची अस्तित्वासाठीच लढाई सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरूनये.
चक्रधर स्वामी
 चक्रधर स्वामी हे सामवेदी लाडभडोच (गुजरात) मधून हा समाज महाराष्ट्रात आला. अन्य काही आख्यायिका आहेत. पण हा पुरावा ग्राह्य धरला तर चक्रधर स्वामी हे खुद्द सामवेदी लाड शाखेचे होते. ते भडोचहून रामयात्रेचे निमित्त करून महाराष्ट्रात आले होते. लीलाचरित्र आणि महानुभाव साहित्यामध्ये हा उल्लेख आढळून येतो. तसेच डॉ. वि.भि. कोलते संपादित आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित शासकीय प्रतींमध्ये पूर्वार्धामधील ३२ क्रमांकाची लीला, उत्तरार्धामध्ये १५0, ५११ या लीलांमध्ये लाड शाखेचा उल्लेख आलेला आहे. अकराव्या शतकात लाड समाज इकडे वावरत होता. त्याला सामाजिक प्रतिष्ठा होती. सन १९३० मध्ये ब्रिटीश  कालीन सरकार असताना धर्मावर आधारीत जनगणना न करता जातीनिहाय जनगणना केली असून त्याचे आजही लाड समाजाकडे पुरावे आढळुन येत आहे. कालांतराने  या  समाजाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय परिस्थिती घसरत गेली. लोकसंख्या मोठी नसल्यामुळे या समाजाची व्होट बँक निर्माण होण्याचा प्रश्नच नव्हता. तुटपुंजी राजकीय वाटचाल पैठणचे घुले व पाथर्डीचे  रोडी तसेच आंतरवालीचे  दखणे , पाटेगावचे रावस , नवगावचे लाड व फुटाणे , हातगावचे लष्करे व कातपूरचे गोगडे  अशा गावांमध्ये सहकारी सोसायट्यांमधील चेअरमनपद आणि ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापर्यंत या समाजाच्या काही मंडळींची वाटचाल हीच काय ती तुटपुंजी वाटचाल! शेवगावचे शेळके, लाटे,   नवगावचे लाड, हातगावचे लष्करे,  पिंपळवाडीचे ठोंबरे , कातपूरचे  रोडी, कोल्हेरचे  जावळे  नागोन्याच्यावाडीचे टोपे बागपिंपळगावचे कोटंबे, गुलवाडीचे थेटे टाके दुनगावचे गोंगे राक्षसभुवनचे धांडे जालन्याचे कंठाले, अ.नगरचे राऊत आडगावाचे तोरकडे पुण्याचे कराले  यांच्यासह काही बोटांवर मोजण्या इतक्याच  गावांमध्ये पोलीस पाटीलकी लाड समाजाकडे होत्या व आहे. तसेच पाटेगावच्या रावस कंपनीकडे कुलकर्णीकी होती. लाड समाजात शिक्षणाचे प्रमाण तसे फारसे नाही. जे आहे, त्यामध्येही मुलांपेक्षा मुलींची संख्या बरी आहे.
 आदित्य गौरव पुरस्काराच्या माध्यमातून प्रसिद्ध कवी व वातट्रिकाकार विलास फुटाणे  यांच्या संकल्पनेतून प्रगती प्रकाशनाच्या वतीने दरवर्षी विशेष कामगिरी बजावणाऱ्या लोकांना पुरस्कार देण्यात येतो.  
मागील  वर्षी  हा पुरस्कार समाजसेविका शिंदुताई सपकाळ व लाड समाजतील अंजली अनिल ठोंबरे यांना पुरस्कार व मान पत्र देऊन गौरव करण्यात आला  होता. आणि या वर्षी  २६/११ च्या मुंबई हल्यात दहशत वाद्याच्या विरुद्ध लढणाऱ्या मुंबई पोलीस उप आयुक्त मा श्री. विश्वास नांगरे पाटील यांना पुरस्का स्मृती चिन्ह मानपत्र  व  रोख २१ हजार रुपये देण्यात येणार आहे. व लाड समाजातील  Er. नेहा शेळके व कु. अनुराधा शिवाजी  लष्करे  हिने राज्यात प्रथम क्रमाक मिळवला आहे या गुणवंत मुलींना  पुरस्कार स्वरूप स्मृती चिन्ह मानपत्र  व  रोख ५ हजार रुपये देण्यात येणार आहे हा पुरस्कार  स्व. यशवंतराव चव्हाण जन्म शताब्दीचे औचित्य साधून आदित्य प्रकाशनाच्या वतीने मंगळवार (दि.१) महाराष्ट्र दिनी देण्यात येणार आहे.  
 पोटजाती अनेक; पणवैष्णव लाड, महाजन लाड, पांचाळ लाड, कारंजे लाड अशा शाखा, उपशाखा लाड समाजात आहेत. तसेच लाड सोनार, लाड सावजी, लाड वाणी, तारकेसी लाड, लाड सुतार, लाड जैन, लाड परदेशी, लाड लोहार आणि लाड ब्राह्मण अशाही पोटजाती आहेत. आता या पोटजाती विसरून एकत्रित येण्याची गरज आहे व रोटी- बेटी व्यवहार वाढविण्याची आवश्यकता आहे. पैठणीला जर काम करण्यास ज्या सोन्याच्या बारीक तारा काढण्याचे काम हा समाज करीत होता व त्यावरच या समाजाचा उदरनिर्वाह चालत होता. कालांतराने स्पर्धेच्या युगात या व्यवसायात लाड समाज टिकू शकला नाही.

तत्कालीन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे सदस्य  सचिव पी.एस. कृष्णन यांनी दिनांक १२/७/९९ रोजी एन.सी.बी.सी. अॅडव्हाईस नं. महाराष्ट्र  २७-२८/९९  ने आदेश पारित केलाला आहे.  त्या प्रमाणे पारित केलेल्या आदेशामध्ये एकूण ३१ जाती दाखवल्या असून त्या मध्ये लाडसमाजाचा क्र.३ मध्ये सामावेश आहे. तरी त्या आदेशानुसार  महाराष्ट्रातील लाड समाजाचा ए.सी. मध्ये समावेश करावा अशी लाड समाजाची  प्रमुख मागणी आहे.
                                                                             श्री अशोक दत्तात्रय  लाड 
                                                                                हातगाव ता. शेवगाव  

No comments: