lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Saturday, August 25, 2012

गोष्ट एका समाज्याची..... भाग २

                         गोष्ट एका  समाज्याची.....   भाग २

           ज्याना जाती विषयी थोडपार ज्ञान होत  त्यांनी शाळेच्या दाखल्यावर लाड जात लिहिली.  पूर्वी पासून जाती विषीय   वाटणारा  अभिमान, अस्मिता, संघटीतपणा, जिव्हाळा प्रेम,  ह्या जातील धन्याला नव्हता व नाही.  त्या मुळे पुढील पिढीवर  जे जाती विषयी  असलेले संस्कार  झालेच नाही. जर पूर्वी पासून संपूर्ण समाज  हा संघटीत असता तर पैठण येथे वैष्णव  लाड धर्मशाळा असती.

                      दिनांक १०/६/१९८८ रोजी  स्थापन झालेल्या  लाड समाज विकास मंडळ महाराष्ट्र राज्य  ह्या संघटनने या काळात संपूर्ण समाज एकत्र  आण्याचा चांगला प्रयन्त केला  त्याचं नियोजन पण  छान होते.  एक  अभ्यास  गट स्थापून त्या गटातील अभ्यासक मंडळीनी त्या गावात राहणाऱ्या  लाड  सामाजाचा  आभ्यास करयचा. या माध्यामातून समाजाचे प्रश्न सोडण्याचा, आसे  अनेक प्रकारचे  चागले उपक्रम  समाजात राबवयाचे अश्याप्रकारे  ह्या संघटननेच  राज्य व्यापी स्वरूप होत.  प्रत्येक  समाज ह्या  संघटनेने गावपातळीवर एकत्र  आण्याच चागलं काम केल. 

                      सामाजिक संघटना/चळव स्वरूप राज्यव्यापी करयचा म्हटल की पैसा हा लागतो तो समजतील लोकवर्गणीतून जमा  करवा  लागतो. त्या  त्या गावातील  संघटनेने  ती  लोकवर्गणी जमा करायची  असते जमलेल्या वर्गणीतील काही हिस्सा / वर्गणी त्या राज्यव्यापी  संघटनेला जमा करयाची असते हा  सर्व साधारण  नियम आहे.

            समाज्यातील धन्यांचा  एकमेकावर विश्वास नसल्यामुळे हा  नियम त्यांना  मान्य नव्हता  त्यामुळे हि राज्यव्यापी  लाड संघटना हि त्या त्या  गावा पुरती मर्यादित राहीली. काही  ठिकाणी चालू आहे तर  काही ठिकाणी  बंध पडलेली आहे.

              आज समजतील काही धन्ये स्वतःला  ब्राह्मन म्हणून मिरवतात  व  लाड म्हणून घेण्याची  लाज वाटते. त्यांना जातीच्या सवलती घेऊन मोठे व्हयला चालत. ज्यांना  दुस-या जातीचा पुळका वाटतो  त्या जातीत त्यांना  काय किमत आहे. याचा विचार करा?  नावाने  ब्राह्मन  होण्याचा पेक्षा कर्माने ब्राह्मन व्हा!  ब्राह्मन जात लावल्याने लाड जातीच शिक्का  थोडीच पुसणार आहे . 

जर  आसच  चालत  रहील तर  जातीच अस्तित्व नष्ट  व्हयला वेळ लागणार नाही.

               समाजातील  एक  आक्का म्हणाली लाड नाव हे ओल्ड वाटते नही तर तूच सांगना  आक्का लाडच (जातीच) बारस करयचं का ? किवा बाई मी लाडाची गं लाडाची या सारख समाज्यासाठी Modern  गीत तयार  करायचं का ? जेणे करून ते ओल्ड वाटणार नाही . हा विनोदाचा भाग सोडा मित्रानो...... .  

आपण  Modern होण्याचा नादात  आपण ह्या  आईला  (जातीला) ओल्ड केल.....      

               त्या जातील लोकांचे  रहानिमाम ,  विचारसारणी, संघटीतपणा  (एकता) जाती विषीय   वाटणारा  अभिमान,  या वरून  जात ही  Modern  की  ओल्ड यावरून  ठरवले जाते. 

   दुसऱ्या जाती किवा समाज जेवढा जुना  आहे तेवढा आपला समाज जुना आहे.  दुसरा समाज Modern  वाटतो  आपला वाटत  नाही का ? गोष्ट एका  समाज्याची.....  वाचा आणि विचार करा.............

  मित्रांनो  जातीच अस्तित्व टिकवण्यासाठी संघटीत व्हा !       

No comments: