lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Thursday, August 23, 2012

गोष्ट एका समाज्याची........ भाग १

गोष्ट एका  समाज्याची.....   भाग  १ 

           आपली जात हि वैष्णव  लाड असून आपण मूळचे  गुजरात चे आपण पूर्वी पासून विष्णू उपासक असल्याने  आपल उपासक दैवत  केशवराज  म्हणजे विष्णू  आहे. केशव मंदिरी जिथे जिथे ह्या समाजाने वास्तव्य केली त्या ठिकाणी  तेर, धाराशिव आताच उस्मानाबाद साखरर्डा कारंजालाड व इतर अनेक ठिकाणी  जुनी केशव मंदिर आहे.  विष्णू उपासक असल्याने   वैष्णव म्हणून  संबोधले जातो.

 

          आपण मुलचे लाट देशाचे म्हणजे आताचा दक्षिण गुजरात तेथे   वैष्णव  ब्राहमण, क्षेत्रिय ह्या प्रमुख तीन जाती होते . या तीनही जाती मध्ये मौज व  जानवे  संस्कार   केली जात होती त्यामुळे जानवे घातली जात होती . आपल्या चाली रिती  ह्या ब्राहमण या जाती सारख्या आहे . १४०० व्या शतकातील दुर्गा देवीचा दुष्काळ  / मुसलमानी  आक्रमण, धर्म प्रसार  ह्या कारणा मुळे वरील जातीला महाराष्ट्र व इतर राज्यात  स्थलांतर करावे लागल्या नंतर त्यांच्या उपजीवेकेचा  प्रश्न निर्माण झाला त्या मुळे  वरील जातीला  विवध व्यावसायचा  स्वीकार करावे लागल्याने  त्या जातीच्या व्यावसायमुळे विवध फोट जाती निर्माण झाल्या .  

 

              लाट  हा शब्द मूळ संकृत शब्द आहे पार्कृत उपचार हा लाड होतो त्यामुळे त्यांच्या जाती पुढे लाड संबोधन लावले जाते ह्या सर्व  बाबीची सविस्तर महिती  मी तुम्हला शोध लाड समाजाचा ह्या लेखात  देणार आहे . 

 

               सध्या गुजरात मध्ये वैष्णव शाखेचा  १२  जाती असून त्या पैकी आपली एक  जात आहे ती म्हणजे वैष्णव लाड. समाजाची  फक्त शाळेचा दाखल्यावर  लाड जात असलेली तिची  आठवण ह्या समाजतील  लोकांना (धन्या) १ आगस्ट १९९५ पासून  येऊ लागली अश्या हया  समाजाची गोष्ट..... २ भागात लिहिणार आहे ....... 

 

            ह्या  समजा मध्ये/ जाती विषीय असलेले  अज्ञान हा शब्द   येथे वाफरणार नाही. तर अजान्त्ये पणा जाणून न घेण्याची मानसिकता त्या मुळे आपली कोणती जात त्याला माहीत नाही असा हा धन्या. 

          ह्या धन्याच लाहान पण तो लाडाचा असल्या मुळे लाडात गेल. तो मोठा झाला  त्याच लग्न झाल... त्याला मुलगा झाला ........ तो मोठा झाला, त्याला शाळेत घातल  गुरजी विचारतात  नाव  क्या  हा धन्या मुलाच नाव सागंतो ...... पुढचा प्रश्न जात कोणती झाली का पंच्यात ...  ह्या धन्याच्या  कानावर लाड शब्द ओजरता गेलला आसतो तो म्हणतो लाड? गुरजीनी हि जात कधी ऐकली नसते. गुरजी  म्हणतो कोणती  लाड...  हा धन्या म्हणतो लिहा  मराठा....  किवा धन्यान सागितलं  माहित नाही तर गुरजी आपल्या सोई प्रमाणे जात टाकतो.  आश्या प्रकारे ग्रामीणभागातील धान्याच्या हातून   चुका होत गेला .........

           शहरी  भागातील धन्याची  परिस्थिती वेगळी नाही  लाड ह्या शब्दा  मुळे आपण कोणते लाड आजूबाजूला ब्राहमण लाड सोनार आश्या अनेक जाती ह्या पैकी आपली जात कोणती  हि द्विधावस्था निर्माण झाल्यामुळे कोणी सोनार कोणी ब्राह्मण आश्या इतर  जाती  लावल्या. 

   ज्याना  जाती विषयी थोडपार ज्ञान होत  त्यांनी शाळेच्या दाखल्यावर  लाड जात लिहिली. 

 

  मित्रांनो गोष्ट अजून संपली नाही.......... भाग दोन मध्य आक्कला  भेटणार आहे .......

 

                                                                                  क्रमशा..........

 

 

  


  

No comments: