lad

LAD SAMAJ>अखिल भारतीय लाड समाज परिषद (All India Council of Lad Samaj) ** संपर्क करा - lad.samaj@yahoo.in /9225914721 || | ♥♥ | ♥♥.|| Before the final battle with Ravana, Lord Rama sought the blessings of Goddess Durga. Happy Vijaya Dasami!||

Saturday, October 27, 2012

12 वीनंतर, पुढे ?

खरे तर 12 वीनंतर प्रत्येकाने डॉक्टर/ इंजिनिअर व्हायलाच हवे असे नाही व ते शक्यही नाही.
मोटीव्हेशनल व करिअर कौन्सलर

12 वीनंतर, पुढे ?
12 वीची परीक्षा झाल्यावर रिझल्ट लागेपर्यंत अनेक पालक आपला वेळ फुकट घालवत असतात. रिझल्टनंतर मग ते अनेक कौन्सिलर्सना फोन करून 12 वीनंतरच्या असंख्य करिअर संधींची माहिती विचारत राहतात. हे अत्यंत चुकीचे आहे.

खरे तर एकूण करिअरच्या भारतात संधी 620 आहेत. 350 विषयांत बीए करता येते आणि 150 विषयांत कॉमर्सचे शिक्षण घेता येते. तसेच 110 विषयांत एम.एस्सी. (12 वीनंतर 5 वर्षे) करता येते आणि 53 विषयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेता येते व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे 84 सर्टिफिकेट कोर्सेस करता येतात. तसेच जीआरई-जीमॅट, सॅट -टोफेलच्या फॉरेन स्कॉलशिप परीक्षा देऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करता येते. यामुळे वार्षिक 8 लाख रु.च्या पगाराची नोकरी अगदी सहज मिळू शकते. देशात याविषयीची सजगता फक्त महाराष्ट्रातच नाही आहे. इतर राज्यांत विशेषत: पंजाब/ केरळमध्ये विद्यार्थी/ विद्यार्थिनी सर्व करिअर्सची माहिती 9 वी ते 12 पर्यंत इंटरनेटद्वारे मिळवून ठेवतात व मग पालकांच्या सहकार्याने आपले करिअर नक्की करतात.

मराठी पालक (पाल्यही) 10 वी, 12 वीची परीक्षा झाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात आणि रिझल्ट लागल्यानंतर आपण करिअर कोणते करायचे हे नक्की करू, असा विचार करतात; पण हे सर्व चुकीचे आहे. 100 पैकी 99 पालकांना किती करिअर या देशात आहेत, किती विद्यापीठे आहेत व त्यांच्या महाविद्यालयांची यादी इत्यादीची कोणतीही माहिती नसते. आपल्या मुलांने (फक्त) डॉक्टर, इंजिनिअर व्हावे अशी इतर राज्यांत पालकांची अपेक्षा नसते. पण मराठी पालक हेच मनाने मान्य करत नाहीत की आपल्या मुलाला/ मुलीला कमी गुण मिळून त्याची वैद्यकीय/ अभियांत्रिकीची अ‍ॅडमिशन जाऊ शकते हे ते लक्षातच घेत नाहीत.

खरे तर 12 वीनंतर प्रत्येकाने डॉक्टर/ इंजिनिअर व्हायलाच हवे असे नाही व ते शक्यही नाही. कारण आपल्या मेंदूचे दोन भाग पडतात एकात आपला भावनांक काम करतो (आटर््स, कॉमर्स/ सर्टिफिकेट कोर्सेस, उद्योजक/ शेती/ व्यवसाय/ राजकारण/ खेळ) यात भावनांकाद्वारे आपण उत्तम करिअर करू शकतो. पण जर भावनांक चांगला असेल तर डॉक्टर/ इंजिनिअर होता येतेच असे नाही; पण मेंदूच्या दुस-या भागात आपला आय क्यू (बुद्ध्यांंक) काम करीत असतो. त्याद्वारे आपण सायन्सला जातो वा वैद्यकीय क्षेत्रात किंवा इंजिनिअरिंगला चांगले गुण मिळवतो; पण पालक हा विचारच करत नाहीत की आपल्या मुलाचा/मुलीचा बुद्ध्यांंक हा जर कमी असेल (तो सायकॉलॉजिस्टकडे टेस्ट करून मिळतो) तर तो मुलगा/ मुलगी सायन्सला कसा जाणार? पण पालकांना अनेकदा मित्र/ मैत्रिणी/ नातेवाइक यांच्यात शेखी मिरवायची असल्यामुळे त्यांना आपल्या मुलाला/ मुलीला 10 वी, 12 वीला कमी गुण मिळाल्याचे सांगायला संकोच वाटतो. या सर्वांमुळे अंतिमत: त्या मुलात/ मुलीत डिप्रेशन येते. क्वचित प्रसंगी दुर्दैवी घटनाही घडतात.

हे सर्व जर टाळायचे असेल तर पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, हॉर्टीकल्चर/ सेरी कल्चर/ अ‍ॅग्रीकल्चर/ डेअरी डेव्हलपमेंट/ मोबाइल रिपेरिंग, टी.व्ही. रिपेरिंग/ जमिनीचा कस सुधारणे, झाडे लावणे/ सायकॉलॉजी, फार्मिंग, तसेच गोबर गॅस प्लँट, प्लंबिंग, गच्चीवरील शेती, बंगल्यातील शेती, गांडुळ शेती, शेतक-यांची शेती, इत्यादी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे जे 84 सर्टिफिकट कोर्सेस आहेत त्यातही उत्तम करिअर आहे. खरे तर प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींना सरकारने 10 वी, 12 वीनंतर व्यवसाय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणीही 10 वी, 12 वी नंतरच्या करिअरची माहिती देणारी अनेक पुस्तके अगदी सहजपणे उपलब्ध आहेत.

गुगलवर जाऊन करिअर कोर्सेस- महाराष्ट्र टाइप करूनही खूप माहिती विद्यार्थी/ विद्यार्थिनींना मिळू शकते; पण रिझल्टपर्यंत झोपा काढणारे पालक ही सहजपणे उपलब्ध असणारी माहिती घेत नाहीत व मग निकालानंतर आपल्या मुलाला/ मुलीला खूप कमी गुण मिळाल्याचे वा तो/ ती नापास झाल्याचे दिसल्यावर हेच पालक खूप घाबरतात. हे सर्व टाळायचे असेल तर यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, गंगापूर रोड, नाशिक वा व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, एलफिस्टन इमारत, सेंट झेवियर्स कॉलेजच्या बाजूला, महापालिका मार्ग, मुंबई व्ही. टी. (व्ही. टी. स्टेशनपासून 5 मिनिटे) इथून सर्व कोर्सेसची माहिती आणून घरात चर्चा करून विद्यार्थी/ विद्यार्थिनींना ही माहिती पालकांनी दिली तर त्यांचे सर्व प्रश्न सुटतील. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी हुशार असतो/ असते; पण ही हुशारी (मेडिकल/ इंजिनिअरिंगची नाही) कसली आहे हे पालकांनीच ओळखायला हवे! खरे तर 12 वीनंतर प्रत्येकाने डॉक्टर/ इंजिनिअर व्हायलाच हवे असे नाही व ते शक्यही नाही.
मोटीव्हेशनल व करिअर कौन्सलर

12 वीनंतर, पुढे ?
12 वीची परीक्षा झाल्यावर रिझल्ट लागेपर्यंत अनेक पालक आपला वेळ फुकट घालवत असतात. रिझल्टनंतर मग ते अनेक कौन्सिलर्सना फोन करून 12 वीनंतरच्या असंख्य करिअर संधींची माहिती विचारत राहतात. हे अत्यंत चुकीचे आहे.

खरे तर एकूण करिअरच्या भारतात संधी 620 आहेत. 350 विषयांत बीए करता येते आणि 150 विषयांत कॉमर्सचे शिक्षण घेता येते. तसेच 110 विषयांत एम.एस्सी. (12 वीनंतर 5 वर्षे) करता येते आणि 53 विषयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेता येते व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे 84 सर्टिफिकेट कोर्सेस करता येतात. तसेच जीआरई-जीमॅट, सॅट -टोफेलच्या फॉरेन स्कॉलशिप परीक्षा देऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करता येते. यामुळे वार्षिक 8 लाख रु.च्या पगाराची नोकरी अगदी सहज मिळू शकते. देशात याविषयीची सजगता फक्त महाराष्ट्रातच नाही आहे. इतर राज्यांत विशेषत: पंजाब/ केरळमध्ये विद्यार्थी/ विद्यार्थिनी सर्व करिअर्सची माहिती 9 वी ते 12 पर्यंत इंटरनेटद्वारे मिळवून ठेवतात व मग पालकांच्या सहकार्याने आपले करिअर नक्की करतात.

मराठी पालक (पाल्यही) 10 वी, 12 वीची परीक्षा झाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातात आणि रिझल्ट लागल्यानंतर आपण करिअर कोणते करायचे हे नक्की करू, असा विचार करतात; पण हे सर्व चुकीचे आहे. 100 पैकी 99 पालकांना किती करिअर या देशात आहेत, किती विद्यापीठे आहेत व त्यांच्या महाविद्यालयांची यादी इत्यादीची कोणतीही माहिती नसते. आपल्या मुलांने (फक्त) डॉक्टर, इंजिनिअर व्हावे अशी इतर राज्यांत पालकांची अपेक्षा नसते. पण मराठी पालक हेच मनाने मान्य करत नाहीत की आपल्या मुलाला/ मुलीला कमी गुण मिळून त्याची वैद्यकीय/ अभियांत्रिकीची अ‍ॅडमिशन जाऊ शकते हे ते लक्षातच घेत नाहीत.

खरे तर 12 वीनंतर प्रत्येकाने डॉक्टर/ इंजिनिअर व्हायलाच हवे असे नाही व ते शक्यही नाही. कारण आपल्या मेंदूचे दोन भाग पडतात एकात आपला भावनांक काम करतो (आर्टस, कॉमर्स/ सर्टिफिकेट कोर्सेस, उद्योजक/ शेती/ व्यवसाय/ राजकारण/ खेळ) यात भावनांकाद्वारे आपण उत्तम करिअर करू शकतो. पण जर भावनांक चांगला असेल तर डॉक्टर/ इंजिनिअर होता येतेच असे नाही; पण मेंदूच्या दुस-या भागात आपला आय क्यू (बुद्ध्यांक) काम करीत असतो. त्याद्वारे आपण सायन्सला जातो वा वैद्यकीय क्षेत्रात किंवा इंजिनिअरिंगला चांगले गुण मिळवतो; पण पालक हा विचारच करत नाहीत की आपल्या मुलाचा/मुलीचा बुद्ध्यांक हा जर कमी असेल (तो सायकॉलॉजिस्टकडे टेस्ट करून मिळतो) तर तो मुलगा/ मुलगी सायन्सला कसा जाणार? पण पालकांना अनेकदा मित्र/ मैत्रिणी/ नातेवाइक यांच्यात शेखी मिरवायची असल्यामुळे त्यांना आपल्या मुलाला/ मुलीला 10 वी, 12 वीला कमी गुण मिळाल्याचे सांगायला संकोच वाटतो. या सर्वांमुळे अंतिमत: त्या मुलात/ मुलीत डिप्रेशन येते. क्वचित प्रसंगी दुर्दैवी घटनाही घडतात.

हे सर्व जर टाळायचे असेल तर पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, हॉर्टीकल्चर/ सेरी कल्चर/ अ‍ॅग्रीकल्चर/ डेअरी डेव्हलपमेंट/ मोबाइल रिपेरिंग, टी.व्ही. रिपेरिंग/ जमिनीचा कस सुधारणे, झाडे लावणे/ सायकॉलॉजी, फार्मिंग, तसेच गोबर गॅस प्लँट, प्लंबिंग, गच्चीवरील शेती, बंगल्यातील शेती, गांडुळ शेती, शेतक-यांची शेती, इत्यादी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे जे 84 सर्टिफिकट कोर्सेस आहेत त्यातही उत्तम करिअर आहे. खरे तर प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींना सरकारने 10 वी, 12 वीनंतर व्यवसाय मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणीही 10 वी, 12 वी नंतरच्या करिअरची माहिती देणारी अनेक पुस्तके अगदी सहजपणे उपलब्ध आहेत.

गुगलवर जाऊन करिअर कोर्सेस- महाराष्ट्र टाइप करूनही खूप माहिती विद्यार्थी/ विद्यार्थिनींना मिळू शकते; पण रिझल्टपर्यंत झोपा काढणारे पालक ही सहजपणे उपलब्ध असणारी माहिती घेत नाहीत व मग निकालानंतर आपल्या मुलाला/ मुलीला खूप कमी गुण मिळाल्याचे वा तो/ ती नापास झाल्याचे दिसल्यावर हेच पालक खूप घाबरतात. हे सर्व टाळायचे असेल तर यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, गंगापूर रोड, नाशिक वा व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, एलफिस्टन इमारत, सेंट झेवियर्स कॉलेजच्या बाजूला, महापालिका मार्ग, मुंबई व्ही. टी. (व्ही. टी. स्टेशनपासून 5 मिनिटे) इथून सर्व कोर्सेसची माहिती आणून घरात चर्चा करून विद्यार्थी/ विद्यार्थिनींना ही माहिती पालकांनी दिली तर त्यांचे सर्व प्रश्न सुटतील. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनी हुशार असतो/ असते; पण ही हुशारी (मेडिकल/ इंजिनिअरिंगची नाही) कसली आहे हे पालकांनीच ओळखायला हवे!

No comments: